राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या नंदुरबार मिरची बाजारात रोज २०० ते ३०० वाहनांतून मिरचीची आवक होत आहे. मात्र, मिरचीला ३,५०० पर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत. परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान होऊन क्वालिटी घसरली आहे. शेतकऱ्यांनी ७,००० पेक्षा अधिक दराची मागणी केली आहे.