आषाढी एकादशीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील शाळांमध्ये राज्याचे प्रतीक असलेल्या पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले.आष्टी तालुक्यातील कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी आषाढी पालखी दिंडी काढत रिंगण सोहळा साजरा केला. कडा शहरांमधून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सजवलेल्या रथामधून विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीची पालखी दिंडी काढली.या पालखीमध्ये पंढरपूरच्या पांडुरंगासह संविधानाचे प्रतही ठेवण्यात आली होती. रथातील पालखी दिंडीचे पूजन करण्यात आल्यानंतर रिंगण सोहळा पार पडला.यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी फुगड्या खेळत रिंगण सोहळ्यांचा आनंद लुटला.त्यानंतर ही पालखी दिंडी ची गावातून प्रदक्षिणा काढण्यात आले.