औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण आता छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. शासनातर्फे यासंदर्भात अधिसूचना (राजपत्र) काढण्यात आली. खा. डॉ. भागवत कराड यांनी यासाठी रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. शिंदे-फडणवीस सरकारने जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर आता रेल्वे स्थानकाचेही नाव बदलले.