दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा होत असतानाच आता शरद पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय.