अकोल्यात एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला.. बाळापूर तालुक्यातील निंबा येथील अल्पभूधारक शेतकरी गोपाल राठोड यांच्या घराला महिंद्रा फायनान्स कंपनीने न्यायालयाच्या आदेशानुसार कुलूप लावलं.. याबाबतची बातमी एनडीटीव्ही मराठीने सर्वप्रथम दाखवली होती.. या बातमीची दखल घेत प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी घराचे कुलूप तोडून शेतकऱ्याला घरात प्रवेश मिळवून दिला.. शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करू नका, गुन्हे दाखल करायचे असतील तर माझ्यावर करा, अशी आक्रमक भूमिका बच्चू कडूंनी घेतली.