आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती....विधानसभा निवडणुकीच्या जय-पराजयानंतर आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेचे मेळावे होणार आहेत... मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत... त्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार?... याकडे लक्ष लागून राहिलंय... उद्धव ठाकरे गटाचा मेळावा यंदा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथं होतोय.. तर बीकेसीमध्ये शिंदे गटाच्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे... या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.