Balasaheb Thorat | शेतकऱ्यांसाठी बाळासाहेब थोरात मैदानात, अहिल्यानगरमध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा

Balasaheb Thorat | शेतकऱ्यांसाठी बाळासाहेब थोरात मैदानात, अहिल्यानगरमध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चा Balasaheb Thorat steps up for farmers; 'Jan-Aakrosh Morcha' held in Ahilyanagar. संगमनेर शहरात शेतकऱ्यांचा जनआक्रोश पाहायला मिळतोय…पंचनाम्याचा घाट न घालता सरसकट दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेस नेते बा़ळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून, विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी संगमनेरच्या रस्त्यावर उतरून प्रशासनाचं लक्ष वेधलंय. शेतीसाठी विद्युत पंपांना पूर्ण क्षमतेनं वीजपुरवठा करावा, लोडशेडिंग तात्काळ बंद करावं, तसेच दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करण्याऐवजी संपूर्ण भागात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या शेतकऱ्यांकडून करण्यात आल्यात.

संबंधित व्हिडीओ