''बारामती दादांसाठी आईसारखी होती'', DCM Sunetra Pawar यांनी भरला उमेदवारी अर्ज | NDTV मराठी

बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा मेळावा झालाय.मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं मला वाटतं नाही. दादाचं जाणं ही फक्त माझी, माझ्या कुटुंबाची व्यक्तीगत हानी नाही, तर बारामती, देश, महाराष्ट्राची हानी झाली असं म्हटल्यास वावग ठरणार नाही” असं सुनेत्रा पवार म्हणाल्यात. तर बारामती दादांसाठी आईसारखी होती. बारामतीचा प्रत्येक नागरिक दादांसाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा हाच दादाचा विश्वास, आधार होता असंही सुनेत्रा पवार म्हणाल्यात.

संबंधित व्हिडीओ