ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर रात्री अज्ञाताकडून दगडफेक करत हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वी पवन करवर याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्याकरता ॲड. ससाणे हे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर माजलगाववरून धारूरकडे जात असताना विसावा हॉटेलच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून ससाणे यांच्या गाडीवर दगड फेक करण्यात आली.