बीड जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय.. आधी सोयाबीन हातातून गेलं, आता कापूसही शेतकऱ्यांना रडवतोय. सात ते आठ फुटांपर्यंत वाढणारा कापूस अवघ्या दोन फुटांवर खुंटलाय. धानोरा परिसरातील सखाराम राऊत यांनी पंधरा एकरांत कापूस लावला. दरवर्षी 200 क्विंटल उत्पादन, मात्र यंदा 30 क्विंटलही मिळणं मुश्किल झालंय. मजुरी परवडत नसल्याने संपूर्ण कुटुंबच कापूस वेचण्यासाठी रानात उतरलंय. या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतलीय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी...
Drought in Beed | 'White gold' brings tears to farmers; cotton plants that should grow to 8 feet are stunted at just 2 feet.