Jarange Patil | Beed Flood | बीडमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जरांगे पाटील

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी पंचनाम्याच्या नावाखाली वेळ न घालवता सरकारने तातडीने सरसकट मदत करण्याची मागणी केली. “मी शेतकऱ्यांचे लेकरू म्हणून त्यांच्या पाठीशी आहे. सरकारने त्वरित मदत केली नाही, तर आम्हाला कळवा,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

संबंधित व्हिडीओ