सतीश उर्फ खोक्या भोसले याला अटक केल्यानंतर हस्तांतरणासाठी प्रक्रिया करण्यात आली.काल सकाळी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी खोक्याला प्रयागराज येथे अटक केली यानंतर त्याला तेथील पोलीस ठाण्यात नेण्यात आले.त्याचे मेडिकल देखील करण्यात आले.प्रयागराज येथील न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं.त्यानंतर खोक्याच्या ट्रान्झिट रिमांडची प्रक्रिया करण्याच आली.त्यानुसार सतीश भोसलेचा ताबा आता बीड पोलिसांनी घेतलाय.सतीश भोसलेला बीड येथील न्यायालयात हजर करण्यात येईल.