बीड तालुक्यातील मोरगाव येथील जाधववस्तीतील घरांमध्ये रात्री झालेल्या पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दरवेळी पाऊस पडला की अशी परिस्थिती उद्भवते अहमदपूर-अहिल्यानगर या महामार्गालगत ही वस्ती असून रोडच्या कडेला नाला तयार न केल्याने पावसाचे पाणी लोकांच्या घरांमध्ये घुसत असल्याची परिस्थिती आहे...यासंदर्भात नागरिकांनी प्रशासकीय पातळीवर अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे मात्र तात्काळ पर्यायी व्यवस्था करून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.