Beed| उद्या पहिला श्रावणी सोमवार, वैद्यनाथ मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी; याच तयारीचा घेतलेला आढावा

उद्या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे. उत्तर घाटावरील पायऱ्यांवर महिला, पुरुष आणि पासधारक भाविकांसाठी वेगवेगळ्या तीन रांगांची सोय करण्यात आली आहे.रांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.दर्शनासाठी उत्तर प्रवेशद्वार, गाभाऱ्यातून दर्शन आणि नंतर पश्चिम द्वाराने निर्गम अशी एकमार्गी व्यवस्था असून त्यामुळे भाविकांचा अनुभव अधिक सोयीस्कर होईल असा ट्रस्टचा विश्वास आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी.

संबंधित व्हिडीओ