गुरुवारी रात्री मुंबईत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन इलेक्ट्रिक बेस्ट बसेसचा अपघात झाला. चर्चगेट स्थानकाजवळ एका बसला आग लागली. तर ठाण्यात एक ई बस दुभाजकाला धडकली. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी गेले नाही.चर्चगेट स्थानकाबाहेर प्लॅटफॉर्म क्रमांक चारजवळ रात्री 9.50 वाजताच्या सुमारास एका इलेक्ट्रिक बसला आग लागली.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि रात्री साडेदहा वाजता आग आटोक्यात आली.बसच्या बॅटरीतील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं समजतंय.