भंडाऱ्यात वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. संजय सरोवर, पुजारी टोला आणि धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे भंडारा शहरातून वाहणारी वैनगंगा नदी ही दुथडी भरून वाहते आहे. प्रशासनाने नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मतुरे यांनी आपण पाहूयात.