राज्यातील काही लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळाले असले तरी विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतोय. भंडारा जिल्ह्यातील सातशे चौऱ्याण्णव शाळेतील विद्यार्थी अद्यापही गणवेशाविनाच आहे. विद्यार्थ्यांसह पालकांना देखील गणवेशाची प्रतीक्षा आहे. शासनाच्या नव्या धोरणामुळे भंडारा जिल्ह्यातील सातशे चौऱ्याण्णव शाळेतील हजारो विद्यार्थी हे गणवेशापासून वंचित आहेत.