Bhiwandi मध्ये Eknath Shinde यांची खेळी बिघडवण्यासाठी BJP चा डाव? नेमकं काय घडतंय भिवंडी महापालिकेत?

भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीत लढणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने निकालानंतर वेगळ्या धोरणाचा अवलंब केल्याने सध्या येथील महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. भिवंडी महानगरपालिकेत भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या. मात्र, शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीला सोबत घेऊन भिवंडीत आपला महापौर बसवण्याची तयारी सुरु केली होती. मात्र, माजी महापौर आणि कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील यांना एका जुन्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भिवंडीतील गेम बिघडणार असे दिसत होते. परंतु, विलास पाटील यांच्या अटकेनंतरही शिवसेना महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

संबंधित व्हिडीओ