पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि माजी भाजप नेते एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरोधात १३ फेब्रुवारी रोजी होणारी आरोप निश्चिती दहा दिवस लांबणीवर गेली आहे....उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाला आरोप निश्चिती दहा दिवस पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत....एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांचा या प्रकरणातून आरोपमुक्त करण्याचा अर्ज विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी फेटाळला....हायकोर्टाच्या निर्णयाला खडसे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.