पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांसाठी आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील वकिलांसाठी अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे. तब्बल चार दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या (सर्किट बेंच) स्थापनेचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी आज (शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५) याबाबतची अधिकृत अधिसूचना (Notification) जारी केली आहे. त्यानुसार, १८ ऑगस्ट २०२५ पासून कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ कार्यान्वित होणार आहे.