पालघरमधील शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय, संशयित म्हणून अशोक धोडींच्या भावालाच ताब्यात घेतलं होतं, पण पोलिसांच्या हातावर तुरी देत संशयित अविनाश धोडी फरार झालेयत. मिळालेल्या माहितीनुसार अशोक धोडी आणि त्यांचे बंधू अविनाश धोडी या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून जमीन आणि संपत्तींवरून वाद सुरू होता, आणि यातूनच त्यांचं अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना असल्याची माहिती मिळतेय. धक्कादायक बाब म्हणजे अविनाश धोडी हे दमणमधून छुप्या मार्गाने दारू आणून त्याची विक्री करत असल्याचीही माहिती समोर आलीय..