मुंबईच्या बोरिवली भागात भाजपने मराठीसाठी पाठशाळेचं आयोजन केलंय.हिंदी भाषिकांना मराठी शिकवण्यासाठी भाजपने या पाठशाळेचं आयोजन केलंय.यात उत्तर भारतीय व्यापारी आणि हिंदी भाषिक रहिवासी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवत आहेत. मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याच्या आणि सांस्कृतिक समन्वयाच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.