पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत दोन माजी आमदारांना धक्का बसलाय. भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे. शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांनी पराभव मान्य करत गावडे यांना शुभेच्छा दिल्यात. माजी आमदार जयंत आसगावकर आणि दत्तात्रय सावंत यांना पराभव स्वीकारावा लागलाय.