मुंबईतील 36 विधानसभांसाठी भाजपचे 108 मंडल अध्यक्षांची निवड करण्यात येणारेय.कोअर कमिटीच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब होणारेय. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 3 मंडल अध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय भाजपने घेतलाय. 100 बुथमागे एक मंडल अध्यक्ष या सूत्रानुसार मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघांसाठी 108 मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत.मुंबई प्रदेश कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे.यात छाननी करण्यात आलेल्या मंडल अध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.