BJP प्रदेशाध्यक्षांकडून आमदारांची कानउघडणी; पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना रवींद्र चव्हाणांनी झापलं

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकीत नाराजीचा सूर उमटल्याचं पाहायला मिळालं. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केल्याची माहिती समोर आली आहे. अपेक्षित प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी न झाल्याने चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तब्बल पाच लाख नोंदणीचे लक्ष्य असताना प्रत्यक्षात केवळ एक लाख नोंदणी झाल्याचं समोर आल्याने त्यांनी संघटनात्मक कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. स्टेजवर बसून मोठेपणा मिरवण्यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना सुनावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

संबंधित व्हिडीओ