मुंबई महापालिकेच्या 2026-27 अर्थसंकल्पातील 800 कोटी रुपयांच्या निधी वाटपात मोठी तफावत समोर आली असून,सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी देताना विरोधकांना लाखांमध्ये मर्यादित ठेवण्यात आल्याने राजकीय वाद चिघळला आहे.यात 800 कोटींच्या निधी वाटपात असमानता असून सत्ताधारी नगरसेवकांना सव्वादोन कोटींच्या आसपास निधी देण्यात आला आहे. तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाखांचा निधी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या एकंदरीत प्रकरणामुळे सत्ताधरी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.