BMC | मुंबई महापालिकेची तिजोरी कुणाकडे?, सुधार समितीचं अध्यक्ष शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार?

मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर ठरल्यानंतर आता सर्वांनाच उत्सुकता लागलीय ती मुंबई महापालिकेच्या तिजोरीची चावी कुणाकडे जाणार याकडे.. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या स्थायी समिती अध्यक्षांच्या हातात असतात. स्थायी समितीचा अध्यक्ष कोण होणार याचा निकाल आज होणाऱ्या महासभेत लागणार आहे. स्थायी समितीचं अध्यक्षपद भाजपकडे तर सुधार समितीचं अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार असल्याची चर्चा आहे. तर सभागृह नेतेपदी गणेश खनकर यांची निवड होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, प्रकाश गंगाधरे यांच्या नावाची चर्चा आहे.

संबंधित व्हिडीओ