Jalgaon ST वर्कशॉपजवळ आढळला वृद्धाचा मृतदेह; उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू झाल्याचा अंदाज | NDTV मराठी

जळगाव शहरातील एसटी वर्कशॉप परिसरात 60 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला.लोधू पाटील असे मृत व्यक्तीचं नाव असून उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.लोधू पाटील हे रविवारी विवाहासाठी बोदवड तालुक्यातील हिंगणे गावात गेले होते.त्यानंतर तिथून जळगावमध्ये परत आल्यानंतर त्यांनी घरी फोन करून सांगितले. मात्र त्यानंतर ते घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला.अखेर आज त्यांचा मृतदेह एसटी वर्कशॉप जवळ आढळून आला.लग्नासाठी बाहेरगावी गेल्यामुळे दिवसभर उन्हात असल्याने उष्मघाताने त्यांचा मृत्यू झाला असा संशय हा नातेवाईकांनी देखील व्यक्त केला आहे.

संबंधित व्हिडीओ