छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील वेदांता औष्णिक वीज प्रकल्पात बॉयलरची नळी फुटल्यामुळे एक मोठी दुर्घटना घडली. यात तब्बल 12 कामगारांचा मृत्यू झालाय.तर इतर कामगार भाजल्यामुळे जखमी झाले आहेत.बाराहून अधिक जखमी कामगारांना तातडीने रायगड येथील 'जिंदाल फोर्टिस रुग्णालयात' दाखल करण्यात आले आहे.अद्यापपर्यंत, मृतांच्या संख्येबाबत कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अनेक जखमी कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले..