Mumbai Mayor Office | मुंबईच्या महापौर कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, अपडेट्स काय? | NDTV
Threat to blow up the Mumbai Mayor's office with a bomb—what are the updates?
मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. धमकीच्या ई-मेलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी एका शाळेवर ग्रेनेड हल्ला* आणि २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दावा करण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये खलिस्तान आणि काही संघटनांची नावे घेण्यात आली असून, ई-मेल प्राप्त होताच मुंबई पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.