Buldhana| शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत द्या, Congress चा पालकमंत्र्यांना घेराव

बुलढाणा जिल्ह्यातील वाढत्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील जिल्हा दौऱ्यावर आले असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवचार पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना घेराव घालण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतातील जळालेले सोयाबीन दाखवत जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली. काँग्रेसकडून बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली.

संबंधित व्हिडीओ