राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (उदा. महानगरपालिका) दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. यामुळे मंत्रिमंडळातील संभाव्य बदल या निवडणुका झाल्यानंतरच केले जातील अशी शक्यता आहे. काही नेत्यांना मंत्रीपद दिल्यास निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणं बिघडतील अशी भीती असल्यामुळे, निवडणुका झाल्यावरच बदल करण्याचा विचार सरकार करत असल्याचे सूत्रांकडून कळते.