मध्य रेल्वेवर रविवारी रेल्वे प्रवाशांचा खोळंबा होणारेय.रविवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान 5 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणारेय.ब्लॉक कालावधीत सीएसएमटी वरून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या कालावधीत सुटणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात येतील.सर्व गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.तर पश्चिम रेल्वेवरही वसई रोड ते वैतरणा स्थानकावर ब्लॉक घेण्यात येणारेय.