चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विहीरगाव-घनोटी जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या साईनाथ मांडवगडे या गुराख्यावर वाघाने हल्ला केला असून ते जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने पाहणी करून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.