Chandrapur | मालधक्क्याला गावकऱ्यांचा विरोध, फडणवीसांच्या काकूंच्या निर्णयाला गावकऱ्यांचा विरोध

चंद्रपूरच्या मुल तालुक्यातील प्रस्तावित मालधक्क्यावरून माजी मंत्री शोभाताई फडणवीस आणि गावकरी संघर्ष पेटलाय.. लोह दगडांची वाहतूक रेल्वेने व्हावी, यासाठी मूल रेल्वेस्थानकावर मालधक्का व्हावा, अशी इच्छा शोभाताई फडणवीसांची आहे.. तर या मालधक्क्यामुळे मूल शहर आणि आजुबाजूची गावे प्रदूषणाच्या विळख्यात गुदमरून जातील, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतलीय. काही मूठभर कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी लाखो लोकांना वेठीस धरू नका, अशी मागणी मूलवासियांनी केली असून, नगरपालिकेने हा मालधक्का कधीच इथे होऊ नये, असा एकमताने ठराव पारित केलाय. शोभा फडणवीसांनी या मालधक्क्यासाठी आग्रह सोडावा आणि इतर दुसरे शेतीपूरक उद्योग आणावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. तर विरोध करणारे स्वतःची शेती वाचवण्यासाठी हा विरोध करीत असून, त्यांनी नीट अभ्यास करावा, असा सल्ला शोभा फडणवीस यांनी दिला.

संबंधित व्हिडीओ