Chh. Sambhajinagar| मतमोजणी केंद्राजवळ DJ वाजवण्याचा प्रयत्न, विभागीय आयुक्तांकडून वाहन जप्तीचे आदेश

छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान डीजेचा आवाज घुमल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई केलीय... चिखलठाणा परिसरातील मतमोजणी केंद्राजवळ एका डीजे व्यावसायिकाने डीजे वाजवण्याची टेस्टिंग करण्याचा प्रयत्न केला.. यावेळी डीजेचा आवाज मतमोजणी केंद्रात सुरू असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विभागीय आयुक्तांनाही ऐकू आला.. याची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्तांनी तात्काळ पोलिसांना संबंधित डीजेचे वाहन जप्त करण्याचे आदेश दिले.. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित वाहन ताब्यात घेऊन एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात जमा केले आहे.. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. Chh. Sambhajinagar | Attempt to play DJ music near vote-counting center; Divisional Commissioner orders seizure of the vehicle

संबंधित व्हिडीओ