छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील नागरिकांना उष्णतेचा जबर दणका बसतोय.शहराचं तापमान थेट 44 अंशांवर पोहोचलं असून गेल्या तीन वर्षांचा उच्चांक मोडला आहे. कडक उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेत. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत, तर उष्माघाताचा धोका देखील वाढलाय.त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणं आता अत्यंत गरजेचं बनलं आहे. तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग देखील सतर्क झालाय. प्रत्येक आरोग्य केंद्र मध्ये शीत कक्ष तयार करण्यात आले असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन देखील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून केले जात आहे.