गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी डीजे विरोधात पहिली मोठी कारवाई करत कडक संदेश दिला आहे. सोयगाव शहरात ध्वनिप्रदूषण आणि नियमांचे उल्लंघन करत डीजे वाजवण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित डीजे जप्त करून कायदेशीर कारवाई केली. या कारवाईमुळे डीजे चालक आणि आयोजकांमध्ये खळबळ उडाली असून उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.