मुंबईतील जुहू चौपाटीवर छठपूजा उत्सव पार पडला. उत्तर भारतीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सूर्याची पूजा केली. छठपूजेनिमित्त भाविकांनी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून आपल्या कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून भाविकांना छठपूजेच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान उद्या सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून या व्रताची सांगता होईल.