Chhath Puja Controversy| छटपूजेवरून राजकीय वातावरण तापलं, बदलापुरात मनसे आक्रमक

छटपूजेवरून बदलापुरात राजकीय वातावरण तापले आहे. बदलापुरातील उल्हास नदीवर केल्या जाणाऱ्या छटपूजेला मनसेने विरोध दर्शविलाय. प्रशासनाकडून उल्हास नदीकाठी छटपूजेची पूर्वतयारी केली जातेय. एकीकडे गणपती विसर्जनास नदीपात्रात निर्बंध आणायचे आणि छटपूजेसाठी पायघड्या टाकायच्या असा सवाल उपस्थित करत बदलापुरात मनसे आक्रमक झाली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका ही पहिल्यापासूनच छटपूजे विरोधात होती. तीच भूमिका आजही असल्याचे म्हणत मनसेने आपला विरोध कायम ठेवला.

संबंधित व्हिडीओ