Chh.Sambhajinagar| बदाम समजून एरंड्याच्या बिया खाल्ल्यानं 24 विद्यार्थ्यांना विषबाधा; तिघे गंभीर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आलीय.. हिवरखेडा–गौताळा रस्त्यावरील एका मदरशात हा प्रकार घडला. मदरशातील विद्यार्थ्यांनी बदाम समजून एरंडाच्या बिया खाल्ल्याने 24 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यामध्ये तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने मदरशातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांवर कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Chh. Sambhajinagar | 24 students suffer food poisoning after eating castor seeds, mistaking them for almonds; three in critical condition

संबंधित व्हिडीओ