भाजप युवा मोर्चाच्या वतीने कोस्टल रोडवरील प्रॉमनेडवर 'नमो युवा रन'चे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या 'रन'ला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त व्यसनमुक्त भारतासाठी ही 'रन' आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अभिनेते मिलिंद सोमण आणि पद्मश्री अशोक सराफ यांनीही सहभाग घेतला.