चिपळूण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही उमेदवारांची नावं जवळपास निश्चित झालेली आहेत. चिपळूणमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतच काटे की टक्कर होणार असं कळतंय. विद्यमान आमदार शेखर निकम अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव असण्याची शक्यता आहे.