CIDCO च्या घरांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करणार, DCM Eknath Shinde यांची घोषणा | NDTV मराठी

सिडकोंच्या घरांसाठी असलेल्या किमती आता 10 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. सिडकोच्या EWS आणि LIG या घटकांसाठी असलेल्या घरांच्या किंमती त्यामुळे कमी होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे 17 हजार घरांच्या किमती कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केलीय.सिडकोसाठी आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आणि एलआयजी घरांसाठी असलेल्या किमती करण्यासंदर्भात अनेक मागण्या होत्या. त्यावर अनेक बैठका झाल्या. सर्वांसाठी घरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न असून त्याला बळ मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

संबंधित व्हिडीओ