सरन्यायाधीश (CJI) गवई यांच्यावर सुनावणीदरम्यान बूट फेकणाऱ्या राकेश किशोर याने एक अजब विधान केले आहे. ‘दैवी शक्तीनेच’ आपल्याला हे कृत्य करायला सांगितले होते, असा दावा त्याने केला आहे. याबद्दल आपल्याला कोणताही पश्चात्ताप नाही, असेही राकेश किशोर म्हणाला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने (BCI) या घटनेची गंभीर दखल घेत त्याला तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.