मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत चित्रीकरणाच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. भाजप नगरसेविका शानू गोहिल पत्रकारांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी पत्रकारांना महापालिकेतून फरपटत बाहेर नेल्याचा आरोप असून, या घटनेच्या निषेधार्थ पत्रकारांनी महासभेच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या गोंधळामुळे महासभेचे कामकाज सध्या थांबवण्यात आले आहे.