CM Devendra Fadnavis आणि Amit Shah यांच्यात दुष्काळावर चर्चा, हर्षवर्धन सपकाळ यांचा भेटीवर निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतलीय. या भेटीदरम्यान शाहांसोबत राज्यातल्या दुष्काळावर सविस्तर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. तसंच अमित शांहांनी राज्याला भरीव मदत देण्याचं आश्वासन दिल्याचंही ते म्हणालेत. राज्यातल्या 300 पेक्षा अधिक तालुक्यांमध्ये अगोदरच दुष्काळ जाहीर झाला असून स्थायी आदेशानुसार मदत दिली जातेय. पण शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी एनडीआरएफच्या निकषानुसार केंद्राकडून मदत मिळणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आजची मुख्यमंत्र्यांची भेट महत्वाची होती. दरम्यान, महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शाहाच आहेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावलाय.

संबंधित व्हिडीओ