सरकारच्या आर्थिक मदतीकडे लक्ष लावून बसलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी उद्या गुडन्यूज मिळणार आहे. शुक्रवारी दुष्काळासंदर्भात जीआर काढला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, यावेळीच बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्या जीआर काढला जाणार असून दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांना मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला.