हायकोर्टाच्या लिपिक पदासाठीच्या परीक्षेत राज्यभरात गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेसाठी संगणक उपलब्ध नसल्याचा आरोप उमेदवारांनी केलाय... त्याचवेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्रावर जमले होते.. यावेळी पोलीस आणि उमेदवारांमध्ये मोठा गोंधळ झालाय.दरम्यान, तिकडे कल्याणमध्येही याच परिक्षेसाठीच्या परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाला.कल्याण एपीएमसी मार्केटमधील लिपिक पदाच्या टायपिंग टेस्टदरम्यान गोंधळ उडाल्याने परीक्षार्थींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.. परीक्षा देण्यासाठी असलेल्या संगणक की बोर्ड मध्ये बिघाड असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.. यावेळी उमेदवार विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं..