मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्याच नेत्यांमध्ये संभ्रम आहे का अशा चर्चांना उधाण आलंय. चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलं असता तारखा तुम्हीच ठरवता अशी प्रतिक्रिया दिली आहे.